Maharashtra Election Result  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Election Result today : महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, आज ठरणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे.

Saam Tv

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर कोण बसणार? हे आज, म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट होईल. सकाळी ८ वाजतापासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या महानिकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. २० नोव्हेंबर २०२४ ला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. आता राज्यातील मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर काही मिनिटांतच निकाल येण्यास सुरुवात होईल.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीत असली तरी, काही अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनीही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना काही ठिकाणी तगडी टक्कर दिल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. अनेक ठिकाणी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होती. तर बऱ्याच ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत झाली.

राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढली, कुणाच्या पथ्यावर पडणार?

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. राज्यात एकूण मतदान ६६.०५ टक्के झाले. सर्वाधिक मतदान हे करवीर या ठिकाणी झाले. येथे ८४.९६ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदानहे कुलाबामध्ये झाले. येथे ४४.४४ टक्के मतदानाची नोंद झाली. आता मतांची वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते, मतदारांच्या मनात नेमकं काय आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

है तय्यार हम!

विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ६६ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यासाठी २८८ मतदान केंद्रे आहेत. तितकेच मतमोजणी निरीक्षक नेमले आहेत. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर साडेआठ वाजता मतदान यंत्रांमधील मतमोजणी सुरू होईल.

सर्वच मतदारसंघांतील टपाल मतपत्रिकांची संख्या अधिक असल्याने २८८ मतमोजणी केंद्रांवर १७३२ टेबल मोजणीसाठी, तसेच ५९२ टेबल ह इटीपीबीएमएस स्कॅनिंगसाठी उभारण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी माध्यमांना सातत्याने माहिती देण्यात येईल.

निकाल कुठे पाहाल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कोणत्या उमेदवाराने आघाडी घेतली, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर https://mahasec.maharashtra.gov.in पाहायला मिळणार आहे. विजयी उमेदवारांचीही यादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केली जाईलच, याशिवाय साम टीव्हीवर SAAM TV वर उद्या सकाळी ६ वाजल्यापासूनच मतमोजणी केंद्रावरील आणि बाहेरील वातावरण, त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक क्षणाची अपडेट पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT