Prakash Ambedkar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections : वंचितकडून १० जणांची दुसरी यादी, माढ्यातून उमेदवार उतरवला, पाहा कोण कोण रिंगणात?

Vanchit Bahujan Aghadi 2 List Of Candidate: विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच वंचितने आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली.

Priya More

गिरीष कांबळे, मुंबई

2024 Maharashtra Legislative Assembly election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होणार आहेत. दसऱ्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही दिवसांपूर्वी वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज वंचित बहुजन आघाडीने दुसरी उमेदवारी जाहीर केली आहे. १० उमेदवारांची यादी वंचितकडून जाहीर करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे आज विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माढ, शिरुळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर जिल्हा अकोला विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मलकापूर शहजाद खान सलीम खान
बाळापूर खातिब सय्यद नतीकउद्दीन
परभणीसय्यद सलीम सय्यद साहेबजान
संभाजीनगर मध्यमोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
गंगापूरसय्यद गुलाम नबी सय्यद
कल्याण पश्चिमअयाझ गुलजार मोहवी
हडपसरमोहम्मद अफरोज मुल्ला
माढाइमतियाज जफर नडाफ
शिरुळअरीफ मोहम्मअली पटेल
सांगलीअल्लाउद्दीन हयातचंद काझी

महाराष्ट्रामध्ये दसऱ्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. मविआ आणि महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. पण वंचित आघाडीने एक पाऊल पुढे टाकत थेट उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितकडून विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत दुसरी यादी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT