Aditya Thackeray And Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Election Result: राज्यात कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल? एकनाथ शिंदे ते आदित्य ठाकरेंपर्यंत हे उमेदवार आघाडीवर

Aditya Thackeray And Eknath Shinde: राज्यात अनेक ठिकाणी ९ ते १० फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुरूवातीचे काल हाती आले आहेत. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Priya More

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणी सुरू असून काही तासांमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी ९ ते १० फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुरूवातीचे काल हाती आले आहेत. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये नागरिकांनी महायुतीला पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीचे अनेक उमेदवार हे विजयी झाले असून काही उमेदवार हे आघाडीवर आहेत.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये सध्या एकनाथ शिंदे ४२,६६६ मतांनी आघाडीवर आहेत. केदार शिंदे १०,९४७ मतं मिळाली आहे.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस १२,२०२ मतांनी आघाडीवर आहेत.

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार ३३,८८६ मतांनी आघाडीवर आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये सध्या जयंत पाटील १२,५८४ मतांनी आघाडीवर आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांनी रायगडच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये सध्या आदिती तटकरे ९,८२४ मतांनी आघाडीवर आहेत.

- शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघामध्ये ते ५,७८६ मतांनी आघाडीवर आहेत.

- भाजपचे नेते निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघामध्ये ते ४,५५३ मतांनी आघाडीवर आहेत.

- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते या मतदारसंघामध्ये ९९७ मतांनी आघाडीवर आहेत.

- भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते या मतदारसंघामध्ये ते ३० हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात ते ५६६ मतांनी आघाडीवर आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे ताजे अपडेट इथं वाचा...

Maharashtra All Constituency Assembly Election results Updates

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT