Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Result: लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं खरं, पण विधानसभेतील महिला आमदारांची संख्या घटली

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ३६३ महिला उमेदवार उतरल्या होत्या. त्यापैकी फक्त २१ महिला उमेदवार विजयी झाल्या. त्यामुळे विधानसभेतील महिला आमदारांची संख्या घटली आहे.

Priya More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये पुन्हा आपलं सरकार आणण्यात महायुतीला यश आले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहीण योजनेचा महायुतीला खूप चांगला फायदा झाला. लाडक्या बहिणींनी महायुतला भरघोस मतं देऊन विजयी केलं खरं. पण यंदा विधानसभेतील महिला आमदारांची संख्या घटली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ३६३ महिला उमेदवार उतरल्या होत्या. त्यापैकी फक्त २१ महिला उमेदवार विजयी झाल्या. यामधील १० महिला या विद्यमान आमदार आहेत. यामधील ११ महिला आमदार यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. महत्वाचे म्हणजे भाजपने या निवडणुकीमध्ये १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये महिला आमदारांची संख्या फक्त ११ आहे.

राज्यात ३ कोटी ६३ लाख महिलांनी मतदानाचा हक्क बाजवला. मागच्या पंचवार्षिक विधानसभेत २७ महिला निवडून आल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून १८ महिलांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. शिवसेना शिंदे गटाकडून ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ४, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ११, शिवसेना ठाकरे गटाकडून १० आणि काँग्रेसकडून ९ महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

विजयी महिला उमेदवारांची नावे -

भाजपच्या महिला आमदार -

श्वेता महाले (चिखली)

मेघना बोर्डीकार (जिंतूर)

देवयानी फरांदे (नाशिक मध्य)

सीमा हिरे (नाशिक पश्चिम)

मंदा म्हात्रे (बेलापूर)

मनीषा चौधरी (दहिसर)

विद्या ठाकूर (गोरेगाव)

माधुरी मिसळ (पर्वती)

मोनिका राजळे (शेवगाव)

नमिता मुंदडा (केज)

श्रीजया चव्हाण (भोकर)

सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व)

स्नेहा पंडित (वसई)

अनुराधा चव्हाण (फुलंब्री)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आमदार -

सुलभा खोडके (अमरावती)

सरोज अहिरे (देवळाली)

अदिती तटकरे (श्रीवर्धन)

सना मलिक (अनुशक्तीनगर)

शिवसेना शिंदे गटाच्या महिला आमदार -

मंजुळा गावित (साक्री)

संजना जाधव (कन्नड)

काँग्रेसच्या महिला आमदार -

ज्योती गायकवाड (धारावी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT