Maharashtra Politics 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला महाराष्ट्रात पहिला मोठा धक्का! शरद पवारांची तगडी फिल्डिंग, प्लान नेमका काय?

Surykanata Patil Join Sharad Pawar Group: लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर भाजपमधून आऊटगोईंग सुरु झालीय. त्याची सुरुवात नांदेडमधून झालीय. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या इनकमिंगने आनंदी झालेल्या भाजपला सुर्यकांता पाटलांच्या रुपाने मोठा धक्का बसलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळ, साम प्रतिनिधी

लोकसभेचा निकाल लागला आणि भाजपला पहिला जबर धक्का बसला तो नांदेडमधून. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटलांनी भाजपचं कमळ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतलीय. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. तर सुर्यकांता पाटील या गांधी-नेहरुंच्या विचारांवर चालत असल्याचं शरद पवारांनी पक्षप्रवेशानंतर म्हटलंय.

विधानसभा निवडणूकीपुर्वी शरद पवारांनी भाजपविरोधात डाव टाकत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या सुर्यकांता पाटलांना गळाला लावलंय. आधी जनसंघ, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजप असा सुर्यकांता पाटलांचा राजकीय प्रवास. मोदी लाटेत 2014 मध्ये सूर्यकांता पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र सासत्यानं दुर्लक्षित राहिल्यानं त्यांनी खदखद वाढत गेली. त्यात अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने सुर्यकांता पाटलांचं महत्व आणखीच कमी झालं. हेच पवारांनी हेरलं आणि सूर्यकांता पाटलांची 10 वर्षांनंतर घरवापसी झाली.

सुर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास

1986 मध्ये राजीव गांधींनी त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलं.

1991 मध्ये नांदेडमधून लोकसभा आणि 1996मध्ये हिंगोली लोकसभेतून खासदार झाल्या.

1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

2004 मध्ये सुर्यकांता पाटलांना शरद पवारांनी केंद्रीय राज्यमंत्री बनवलं.

पुढे 2014 मध्ये सुर्यकांता पाटलांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला.

सुर्यकांता पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे हादगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. याचा काहीसा परिणाम नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातली समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे यावर आता भाजप काय रणनीती आखणार याकडे लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT