Nilesh Lanke Oath Video: लंकेंनी विखेंना उत्तर दिलं; त्याचा मला अभिमान; शरद पवारांकडून निलेश लंकेंचं कौतुक

Sharad Pawar Praises MP Nilesh Lanke For Their Oath: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून पवारांनी निलेश लंकेंवर कौतुकाचा वर्षाव केला.
Nilesh Lanke Oath Video: लंकेंनी विखेंना उत्तर दिलं; त्याचा मला अभिमान; शरद पवारांकडून निलेश लंकेंचं कौतुक
Sharad Pawar Praises Nilesh LankeSaam TV

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.खासदार लंकेंनी इंग्रजीतून भाषण करत भाजप नेते सुजय विखे पाटील यांना खणखणीत उत्तर दिलं अशी, अख्या राज्यात रंगलीय. इतकेच लंकेच्या भाषणाचं कौतुक खुद्द शरद पवार यांनी केलंय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत निलेश लंकेंवर कौतुकाचा वर्षाव केला. संसदेत इंग्रजी आणि मराठीसह कोणत्याही भाषेत बोलता येतं. एखाद्या व्यक्तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. मला वाटतं त्याचं उत्तर निलेश लंकेंनी विखेंना उत्तर दिलं त्याचा मला अभिमान आहे, असं शरद पवार म्हणालेत. आता सुजय विखे पाटील लंकेंच्या शपथविधीवर काय बोलणार? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com