Sharad Pawar News : सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आपल्यासमोर आव्हान, शरद पवार यांची प्रतिक्रिया

भाजपनेत्या सुर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी पक्षप्रवेश केला आहे.

भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे. सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. सुर्यकांता पाटील यांच्या प्रवेशावर शरद पवार म्हणाले की पाटील यांनी मध्यल्या काळात त्यांनी वेगळा निर्णय घेतला होता. पण त्या कुठेही गेल्या तरी त्यांच्या मनात केवळ राष्ट्रवादीत आहे. त्यांचं राजकारण विचारांवर आधारित होतं. त्यामुळे त्या पुन्हा येतील हा विश्वास होता, अतिशय योग्य वेळी त्यांनी आता निर्णय घेतला आहे. सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे. मराठवाड्यात आपल्याला जे चित्र बघायचं त्यात त्यांचा हातभार लागेल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com