Assembly Election 2024  Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election 2024: विधानसभेची तयारी पूर्ण, 288 मतदारसंघात किती मतदार? पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली, वाचा संपूर्ण अहवाल!

Maharashtra final Electoral Roll Records : यंदा विधानसभा निवडणुकीपू्र्वी भारतीय निवडणूक आयोगाने मतदारसंख्येचा आढावा घेतलाय. यामध्ये महिला मतदारांची संख्या वाढली असल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

Maharashtra Assembly Election Electoral Roll Records in 288 Constituencies: राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आगामी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांची सुधारिक यादी जाहीर केलीय. या यादीमधून महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचं समोर आलंय. आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेवू या.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सुधारित मतदार यादी जाहीर करण्यात आलीय. ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात जवळपास ९.५३ कोटी मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील तरुणांची संख्या आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या केवळ १८.६ लाख आहे. राज्यातील एकूण मतदारांपैकी हे प्रमाण केवळ २ टक्क्यांहून कमी आहे.

महिला मतदारांची संख्या वाढली

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीत राज्यातील एकूण पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलीय. महिला मतदारांची संख्या ४.६ कोटी तर पुरुष मतदारांची संख्या ४.९ कोटी आहे.सध्या स्त्री-पुरुष गुणोत्तर ९२५:९३३ असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलीय. ही माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार (Vidhan Sabha Election) मिळतेय.

या यादीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (८६ लाख) मतदार आहेत. त्यानंतर मुंबई उपनगरे (७५.८ लाख) आणि ठाणे (७० लाख) आहेत. विदर्भातील आदिवासी जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये राज्यात सर्वात कमी (८.१ लाख) मतदार आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त (Maharashtra Assembly Election 2024) आहे. कारण पुरुष कामासाठी शहरांमध्ये जातात. मुंबईजवळील कोकण विभागात, रत्नागिरी जिल्ह्यात अधिक महिला मतदार आहेत. सिंधुदुर्गमध्ये देखील महिला मतदारांची संख्या अधिक आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात ७,९५७ महिला मतदार आहेत. विदर्भातील गोंदिया या आदिवासी जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या १५,०४७ इतकी आहे. गोंदियाला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.

सर्व वयोगटातील मतदारांची संख्या किती ?

वयोगटानुसार विचार केल्यास ३० ते ३९ आणि ४० ते ४९ वर्षे या वयोगटात सर्वाधिक म्हणजेच २ कोटींहून अधिक मतदार आहेत. २० ते २९ वयोगटातील १.८ कोटी मतदार आहेत. ८० आणि त्यावरील वयोगटातील २५.४ लाख मतदार (Maharashtra final Electoral Roll) आहेत. तर १८ ते १८ या वयोगटात १८.६ लाख मतदार आहेत.६ ऑगस्ट रोजी मतदारांचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ तीन आठवड्यातच मतदारांची संख्या १८.६ लाखांनी वाढली आहे. महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नवीन मतदारांची नोंदणी केल्यामुळे ३.७ लाख मतदारांची वाढ झालीय.

भारतीय निवडणूक आयोगा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यांमध्ये केंद्रीत नोंदणीवर भर देत आहे. जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि झारखंडमध्ये अशाच प्रकारच्या मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. यामुळे पात्र नवीन मतदारांना स्वतःची नोंदणी (Female Voters) करता आली, तर विद्यमान मतदारांना २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीतील बदल, दुरुस्त्या आणि त्यांचे तपशील अपडेट करण्याची संधी मिळाली आहे. अनेक मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीतून आपलं नावं गायब झाल्याच्या, मतदान केंद्र सापडत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या मतदारांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा नोंदणी करून त्यांचं नावं तपासण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT