Sadabhau Khot on Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शरद पवारांनी आकाशतही राज्य केलं असतं, मविआ कौरवांची फौज..', सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती: शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या, महाराष्ट्रात जो गोंधळ सुरु आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरु आहे, असे म्हणत विधानपरिषदेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अमरावतीमध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"साखर कारखानदारी ही बारामतीच्या ताब्यात आहे. शरद पवार म्हणजे अलीबाबा, शरद पवारांएवढे एवढा पापी या जगात कोणी नाही. त्यांना मानावे लागेल, आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवलं आहे. नाहीतर शरद पवार यांनी आकाशात सुद्धा राज्य केलं असतं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात जो गोंधळ सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरू आहे," असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला.

"शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या. या पवारांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संपवला. पण या महाराष्ट्रातून शरद पवार यांना एकच माणूस संपवता येत नाहीये. त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना संपवता येत नाही म्हणून शरद पवार महाराष्ट्रात आग लावत सुटले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, यावर्षी निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आहे.." असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

"एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पांडवांची फौज या निवडणुकीत उभी राहणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद यांच्यासारख्या रावणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कौरवांची फौज उभी राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या लुटारूंना गाडावे लागेल. भारतीय जनता पार्टी मधल्या अमुक-मुख्याने विश्वासघात केला असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. सत्तेच्या लालसेसाठी तुम्ही तत्त्वांना तिलांजली दिली. वसंतदादांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्या पवारांना सोबत घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. या निवडणुकीत मविआला गाडावे लागेल," अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atul Parchure Death : प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड, वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाण्याची शक्यता

Nagpur News : पोहोयला गेले अन् घात झाला; नागपुरात चार विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

Sharad Pawar Speech: 'पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे', फलटणच्या सभेत शरद पवार यांचं रोखठोक भाषण

Marathi News Live Updates : कल्याणमध्ये तुफान पाऊस, रेल्वे स्टेशन परिसरत पाणी साचलं

SCROLL FOR NEXT