Sharad Pawar News SaamTv
महाराष्ट्र

Sharad Pawar : पवारांचा गड भेदला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश; साखर पट्ट्यात 'तुतारी'ची पिछेहाट

Sharad pawar, ncp Maharashtra Assembly election 2024 : शरद पवारांच्या तुतारीला मतदारांनी का दाखविली नापसंती? साखर पट्टयातील पराभवाची नेमकी कारणे काय?

Namdeo Kumbhar

मुंबई : (Maharashtra Assembly election 2024)  विधानसभा निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूकीच्याआधी प्रचार आणि निवडणूकीचे मुद्दे पाहता महायुतीचा पगडा महाविकास आघाडीच्या तुलनेत भारी होता हे सर्वांनाच दिसले, मात्र यंदाची निवडणूक आणखी एका कारणासाठी महत्वाची मानल्या जात होती. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत होती. निवडणूकीचे निकाल पाहता शरद पवार गटाच्या तुलनेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरले ते आपण जाणून घेऊया. 

मतदारांचा कौल अजित पवार गटाला

यंदाच्या विधानसभा निवडणूकीत तब्बल 40 जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार आमने-सामने होते. यामध्ये बारामतीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती. अजीत पवारांनी तब्बल एक लाख मतांनी पुतण्या युगेंद्र पवार याचा पराभव केला. 40 जागांपैकी फक्त 7 जागांवरच शरद पवार गटाला आपला गड राखता आला. उर्वरीत 30 जागांवर अजित पवार गटाला यश मिळाले. 

राखर पट्टा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गड मानला जातो. शरद पवार यांनी साखर कारखण्यासाठी केलेली कामे ही सर्वश्रृत आहेत, असे असतानाही यंदाच्या निवडणूकीत शरद पवार गटाला या भागात पराभवा सामना करावा लागला. यंदाच्या निवडणूकीत लाडकी बहिण योजना ही मतदारांना आकर्षित करण्यासाठी निर्णायक ठरली. 

सर्वसामान्यांनी या योजनेचा भरभरून लाभ घेतल्यामुळे महाविकास आघाडीनेदेखील या योजनेच्या विरूद्ध तिव्र भूमिका घेणे टाळले. याचा लाभ महायुतीला झाला. लाडकी बहिण योजनेच्या प्रचारापुढे महाविकास आघाडीचे सर्व मुद्दे फोल ठरले. हेच समिकरण साखर पट्ट्यातील मतदार संघातही लागू पडले. परिणामी काही निवडक जागा सोडल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. यंदाच्या निवडणूत विकासाचा मुद्दा हा दुय्यम अल्याचेही अनेकांना जाणविले. या निवडणूकीत लाडकी बहिण योजना सर्व मुद्द्यांवर भारी पडल्याची चर्चा आहे.   

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: आयपीएलची पहिली बोली १८ कोटींची! स्टार गोलंदाजावर लागली सर्वात मोठी बोली

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

Diljit Dosanjh Concert: गायक दिलजीत दोसांझचा पुण्यात म्युझिक कॉन्सर्ट, चंद्रकांत पाटील यांचा विरोध; कारण काय?

Vinod Nikole News : पालघर डहाणूवर पुन्हा फडकला लाल झेंडा, सीपीएमचे विनोद निकोले पुन्हा झाले आमदार

Aheri Election result 2024 : अहेरीत बाप विरूद्ध मुलगी लढत, धर्मरावबाबा अत्राम यांनी केला मुलीचा पराभव

SCROLL FOR NEXT