Raj Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उमेदवारीवरुन मनसेत भूकंप! प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम; भांडुपमध्येही राज ठाकरेंना धक्का

Ranjit Shirole Resign MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच भांडुपमध्ये मनसेचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा उमेदवारांची जाहीर होताच नाराजीनाट्य, बंडखोरीला ऊत आला आहे, ज्याचा मोठा धक्का राज ठाकरेंच्या मनसेला बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच भांडुपमध्ये मनसेचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले असून शिरीष सावंत यांना उमेदवारी घोषित केल्याने विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेला रामराम ठोकला आहे. मी मनसे स्थापन झाल्यापासून मनसे सोबत काम करत आहे. ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या, अनेक कामे दिली, निवडणुका लढवल्या. मी शिवाजीनगर मतदारसंघात काम करत आहे, ,मी निवडणूक लढवायची की नाही हे अजून ठरवले नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडत असल्याचे स्पष्ट केले.

मनसेने पुण्यात अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही, त्याबद्दल काय घडलं नाही. मी निवडणूक लढवायची की नाही हे अजून ठरवले नाही. मी नाराज नाही, कोणताही वाद नाही, तसेच रागात घेतलेला निर्णय नाही. मनसे शिवाजीनगर लढणार नाही असे झाले नाही, पण मी पक्षावर बोलणार नाही. मला कुठल्याही पक्षाची ऑफर नाही, पण निवडणूक फॉर्म आणला आहे,त्यामुळे लढू शकतो, असेही ते म्हणालेत.

भांडुपमध्येही मनसेला भगदाड

दुसरीकडे भांडुपमध्येही मनसेचे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. शिरीष सावंत यांना उमेदवारी घोषित केल्याने भांडुप विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर आपले नाराजी पत्र लिहीत या पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकला. शिरिष सावंत यांच्या उमेदवारीवरुन आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या २ महिने आधी शिरीष सावंत साहेबांना बोललो तुम्ही भांडूपमधून निवडणूकिला उभे राहा म्हणालो, तेव्हा ते लढणार नाही म्हणाले. आज त्यांची उमेदवारी कोणत्याही भांडूप विधानसभेच्या पदाधिकार्यांना न विचारता जाहीर झाली. शिरीष सावंत यांनी भांडूपच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर आम्ही सर्वानी मोठ्या ताकदीने काम केलं असते. शिरीष सावंत यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर असलेला अविश्वास दिसून येतो, असे या पत्रात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND Vs NZ 2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार

Paneer Eating Benefits: धावपळीच्या जगात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Ajit Pawar vs Yugendra Pawar : शरद पवार यांचा 'नवा गडी, नवा डाव'; बारामतीत अजित पवारांविरोधात उमेदवार कसा ठरला?

Maharashtra Assembly Election : बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; कुणाला मिळाली उमेदवारी? शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे ६ वर्षांसाठी निलंबन

SCROLL FOR NEXT