Raju Shetti on Sharad Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Raju Shetti : तिसऱ्या आघाडीवर शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी, राजू शेट्टी संतापले; म्हणाले...

Raju Shetti on Sharad Pawar : तिसऱ्या आघाडीवरून शरद पवार यांनी मिश्किल टीका केली आहे. यावर आता राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Satish Kengar

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यातल्या तिसऱ्या आघाडीवरून शरद पवार यांनी खिल्ली वडवली आहे. यावरच आता स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये आपल्याला झोप लागत नाही. आपण प्रचंड अस्वस्थ झालो आणि संभाजी राजे महान घराण्यातले आहेत, मिश्किल टीका शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीवर केली होती.

यावर आता राजू शेट्टीने जोरदार पलटवार केला आहे. खिल्लीचा परिणाम काय होतो हे तुम्ही 2009 मध्ये कोलापूरमध्ये पाहिला आहे. महाराष्ट्राच्या सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही, तुमच्या बगलबच्चांनी शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील साखर कारखाने लुटले म्हणून काय झाले. महाराष्ट्राचा सातबारा तुम्हाला खंदून दिलेला नाही, हे लक्षात ठेवावे, असं ते म्हणाले.

शरद पवार यांच्यावर टीका करत राजू शेट्टी म्हणाले की, ''तुम्ही कसले धर्मनिरपेक्ष, 2014 मध्ये भाजपाला तुम्हीच पहिल्यांदा पाठिंबा दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे भाजपाला पाठिंबा देणार हे सांगण्याचे धाडस करावे, असे आवाहन करत अनेक राज्यात तुम्ही कशासाठी निवडणूक लढवली होती. हे सगळ्यांना माहित आहे, असा टोला देखील राजू शेट्टी यांनी लगावला आहे. ते सांगलीत बोलत होते.

काय म्हणाले होते शरद पवार?

तिसऱ्या आघाडीवर मिश्किल टिप्पणी करत शरद पवार म्हणाले होते की, ''मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करत असून राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणार. संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपले काय होणार, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.''

तिसरी आघाडी नाही, चांगला सुसंकृत पर्याय - संभाजीराजे

तिसरी आघाडी नाही तर लोकांसमोर चांगला सुसंकृत पर्याय आम्ही घेऊन चाललो असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडमध्ये बोलताना सांगितलं आहे. लोक अस्वस्थ आहेत, व्यथित आहे. तेच तेच चालू आहे, कोण खुर्द कोण बुदृक, एकाने दूसरा, एकाने तिसरा विचार मांडायचा हा खेळ चालू आहे. अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी चालू असलेल्या राजकारणावर टिका केली. स्वराज्य पक्ष सर्वच जागांवर लढण्याच्या प्रयत्नात आहे. अनेक लोक जॉईन होताहेत. पण 288 हे टार्गेट असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT