Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024: मविआमधील तिढा सुटणार; नाशिक, भायखळासह अनेक ठिकाणी काँग्रेस घेणार माघार

Congress News: महायुतीमध्ये जागा वाटपावरून झालेला तिढा सुटणार आहे. कारण काँग्रेस उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला होता. अनेक जागांवर ठाकरे गट ठाम होता. तर काँग्रेस देखील काही जागांवर आपला उमेदवार उतरवण्यासाठी ठाम होते. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. काँग्रेसने काही ठिकाणी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण आता महायुतीमध्ये जागा वाटपावरून झालेला तिढा सुटणार आहे. कारण काँग्रेस उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष काही जागांवर माघार घेण्याच्या तयारीत आहे. नाशिक, भायखळा अन्य काही जागांवर काँग्रेस पक्ष माघार घेणार आहे. आज बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे. ४ तारखेला अर्ज मागे घेण्याच्या तयारीत काँग्रेस पक्ष आहे.

महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी काही मतदारसंघामध्ये एकमेकांविरोधामध्ये उमेदवार उभे केलेत. त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे बोलले जात होते. पण आता ज्याठिकाणी काँग्रेसने बंडखोरी केली होती. त्या जागांवर काँग्रेस माघार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे टेन्शन मिटलं आहे. ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत.

काँग्रेसचे नेते रमेश चैन्नाथला आणि नाना पटोले यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी रमेश चैन्नाथला यांनी सांगितले की, 'महाविकास आघाडी एकजूट होऊन निवडणुका लढायला तयार आहोत. महायुतीत‌ खूप लढाई सुरू आहे. महाविकास आघाडीत कुठेही मतभेद नाहीत. भाजपचे नेते शिंदे, अजित पवार गटात जाऊन लढत‌ आहे. विचित्र आघाडी आहे ही भाजपचच ही निवडणूक लढत आहे. महाविकास आघाडीत असं नाहीये. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढाई होणार नाही. ज्यांनी अर्ज भरलेत त्यांना मागे घ्यायला सांगितलं जाईल. सपाबरोबर चर्चा सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT