MVA Seat Sharing : फक्त २७ तास शिल्लक! मविआचे जागावाटप कधी होणार पूर्ण? नाना पटोले यांनी दिलं उत्तर

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 27 तास शिल्लक असताना मविआचे जागावाटप कधी पूर्ण होणार, याचे उत्तर नाना पटोले यांनी दिले.
फक्त २७ तास शिल्लक! मविआचे जागावाटप कधी होणार पूर्ण? नाना पटोले यांनी दिलं उत्तर
MVA Seat Sharing Saam Tv
Published On

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त २७ तास शिल्लक असताना महाविकास आघाडीचे जागावाटप अद्यापही पूर्ण झालं नाही. मविआचे जागावाटप कधी पूर्ण होणार असा प्रश्न काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. याचेच उत्तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.

मविआचे जागावाटप कधी होणार पूर्ण?

मविआच्या जागावाटपाबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले आहेत की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा उद्या सकाळपर्यंत पूर्ण क्लिअर होणार, असं ते म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. सध्या जो बंडखोरीचा कल्लोड आहे, तो आपोआपचं शांत होईल.

फक्त २७ तास शिल्लक! मविआचे जागावाटप कधी होणार पूर्ण? नाना पटोले यांनी दिलं उत्तर
Pawar vs Pawar : फक्त पवार साहेबांना साथ द्यायची, काकाविरोधात अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवार काय म्हणाले?

महाविकास आघाडीचे भंडाऱ्याचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांना उबाठानं एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करताना नाना पटोले यांनी सर्व वेळेच्या आत शांत होईल, अशी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या तिढ्याची गोष्ट नाही, तर महायुतीच्या भाजपमध्येही तेच चाललेलं आहे. उद्या सकाळपर्यंत चित्र क्लिअर होईल.

याआधी नागपूरमध्ये बोलताना ते म्हणाले आहेत की, ''जागावाटप हा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असतो. अजूनही एक दोन जागेबद्दल महाराष्ट्रात बाकी आहे. हायकमांड लक्ष घालत आहे. मित्र पक्षाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागावाटपाच्या समाप्तीकडे आम्ही चाललो आहोत.''

फक्त २७ तास शिल्लक! मविआचे जागावाटप कधी होणार पूर्ण? नाना पटोले यांनी दिलं उत्तर
Pawar vs Pawar : फक्त पवार साहेबांना साथ द्यायची, काकाविरोधात अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवार काय म्हणाले?

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, शिवसेनेची नाराजी काय ते त्यांची व्यक्तिगत मत आहे. मग आम्ही म्हणायचं कोकणात आम्हाला काहीच मिळालं नाही. हा विषय नाही संजय राऊत यांनी या सगळ्याला क्लोज केलं पाहिजे. विरोधकांसोबत आपल्याला लढायचं ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे, त्यामुळे मला असं वाटतं संजय राऊत यांनी विरोधकांच्या बाबतची भूमिका ठेवली पाहिजे, असं माझंमत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com