bjp will cut ticket of these five sitting mlas? Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप भाकरी फिरवणार? 'या' 5 आमदारांचे तिकीट कापणार? वाचा...

Satish Kengar

भारत माहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असतानाच मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राम कदमांसह 5 विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री लावून भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर डच्चू देण्यात येणार असलेले 5 आमदार कोणते? ते जाणून घेऊ...

वर्सोवा

भारती लव्हेकरांऐवजी संजय पाण्डेय यांच्या नावाला पसंती?

घाटकोपर पश्चिम

राम कदमांचा पत्ता होण्याची शक्यता.

घाटकोपर पूर्व

पराग शाहांच्या जागी प्रकाश मेहतांचं पुनर्वसन?

सायन

तमिल सेल्व्हनऐवजी प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा.

बोरिवली

सुनील राणेंच्या जागी गोपाळ शेट्टींच्या नावाची चर्चा

मुंबईतील विद्यमान 5 आमदारांच्या तिकीट कापलं जाण्याविषयी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी भाष्य करणं टाळलंय. तर योग्य उमेदवारांना तिकीट मिळतील, असा विश्वास व्यक्त केलाय.

विविध उत्सवांमधून चर्चेत असलेल्या राम कदमांच्या घाटकोपर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या संजय दिना पाटलांना 15 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे कदमांविरोधातील नाराजीमुळे त्यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.. त्याबरोबरच विद्यमान आमदारांचे तिकीट कापून त्या ठिकाणी जुन्या भाजप कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे मुंबईत विद्यमान आमदारांचं टेंशन वाढलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varun Sardesai : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी? वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित, VIDEO

Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

Maharashtra News Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Meeting Inside Story : उद्धव ठाकरे अनुपस्थित, आदेश निघाला; मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, नक्की काय घडलं?

Sameer Wankhede: समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात? वानखेडेंची राजकारणात एन्ट्री?

SCROLL FOR NEXT