विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यातच लोकसभेत पराभूत झालेल्या राम सातपुते यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखलवत त्यांना माळशिरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच नागपूर मध्यमधून प्रवीण प्रभाकरराव दटके यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर पश्चिममधून सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि नागपूर उत्तरमधून डॉ मिलिंद पांडुरंग माने यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यातच कोणाला कुठून तिकीट मिळालं आहे, हे जाणून घेऊ...
मूर्तिजापूर (SC): हरीश मारोतीअप्पा पिंपळे
कारंजा : साईप्रकाश डहाके
तेओसा : राजेश श्रीराम वानखडे
मोर्शी : उमेश (चंदू) आत्मारामजी यावलकर
एरवी : सुमित किशोर वानखेडे
काटोल : चरणसिंग बाबुलालजी ठाकूर
सावनेर : डॉ.आशिष रणजित देशमुख
नागपूर मध्य : प्रवीण प्रभाकरराव दटके
नागपूर पश्चिम : सुधाकर विठ्ठलराव कोहळे
नागपूर उत्तर (SC): डॉ मिलिंद पांडुरंग माने
साकोली : अविनाश आनंदराव ब्राह्मणकर
चंद्रपूर (SC): किशोर गजाननराव जोरगेवार
आर्णी (SC): राजू नारायण तोडसाम
उमरखेड : किशन मारुती वानखेडे
देगलूर : जितेश रावसाहेब अंतापूरकर
डहाणू : सुरेश मेधाला होकार दिला
वसई : स्नेहा प्रेमनाथ दुबे
बोरिवली : संजय उपाध्याय
वर्सोवा : भारती हेमंत लव्हेकर
घाटकोपर पूर्व : पराग किशोरचंद्र शहा
आष्टी : सुरेश रामचंद्र धस
लातूर शहर : अर्चना शैलेश पाटील चाकूरकर
माळशिरस : राम विठ्ठल सातपुते
कराड उत्तर : मनोज भीमराव घोरपडे
पलूस-कडेगाव : संग्राम संपतराव देशमुख
दरम्यान भाजपने आपल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या यादीत २२ उमेदवार जाहीर केले होते. तिसऱ्या यादीत २५ नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आतापर्यंत एकूण १४६ जाहीर केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.