Sandeep Kshirsagar Criticized Jaydatta Kshirsagar Saam Tv
महाराष्ट्र

Beed Constituency: बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर Vs संदीप क्षीरसागर, काका-पुतण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच

Sandeep Kshirsagar Criticized Jaydatta Kshirsagar: जनतेच्या आशीर्वादाने निकालातून उत्तर देणार, असं म्हणत काका जयदत्त क्षीरसागर यांच्या टीकेला पुतण्या आमदार संदीप यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीडमध्ये काका-पुतण्या पुन्हा आमने-सामने आले आहेत. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर एकमेकांवर टीका करत आहेत. काका जयदत्त क्षीरसागर यांच्या टीकेला पुतण्या आमदार संदीप यांनी पलटवार केला आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या टीकेला निकालाच्या माध्यमातून उत्तर देणार असं वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड विधानसभा मतदारसंघातील टोल बंद करायचा असेल, गुटखा, वाळू बंद करायची असेल, तर या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. असं टीकास्त्र डागद माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण बीड विधानसभेसाठी अपक्ष निवडणूक लढवणार आहोत, असं जाहीर केलं. काकाच्या या टीकेला आता संदीप क्षीरसागर यांनी उत्तर दिले आहे. २०१९ ला जसं जनतेच्या आशीर्वादाने त्यांना उत्तर दिलं होतं त्याच पद्धतीने या वेळेस देखील या टीका करणाऱ्यांना जनतेच्या आशीर्वादाने निकालातून उत्तर देणार आहे, असा फलटवार आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर केला आहे..

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यांनी बीडच्या लवकर राजुरी येथील ग्रामदैवत असणाऱ्या नवगण गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर ते आपल्या आई क्षीरसागर यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले असून आता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर याच्यावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT