Mahayuti Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३१ जागा लढवणार, सूत्रांची माहिती

Loksabha Election 2024 : भाजप ३१ जागा, शिवसेना शिंदे गट १३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४ लोकसभेच्या जागा मिळतील, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Mahayuti Politics
Mahayuti PoliticsSaam TV

सूरज मसूरकर | मुंबई

Mahayuti Jagavatap News:

भाजपने राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला नसल्याने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता समोर येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे. यामध्ये भाजप ३१ जागा, शिवसेना शिंदे गट १३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४ लोकसभेच्या जागा मिळतील, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. लवकरच तिन्ही पक्ष आपल्या उमेदवारांचा यादी जाहीर करु शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahayuti Politics
Maval: मावळ मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची नरमाईची भूमिका

भाजपची २० उमेदवारी जाहीर

  • चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

  • रावेर - रक्षा खडसे

  • जालना- रावसाहेब दानवे

  • बीड - पंकज मुंडे

  • पुणे- मुरलीधर मोहोळ

  • सांगली - संजयकाका पाटील

  • माढा- रणजीत निंबाळकर

  • धुळे - सुभाष भामरे

  • उत्तर मुंबई- पियुष गोयल

  • उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा

  • नांदेड- प्रतापराव चिखलीकर

  • अहमदनगर- सुजय विखे पाटील

  • लातूर- सुधाकर श्रृंगारे

  • जळगाव- स्मिता वाघ

  • दिंडोरी- भारत पवार

  • भिवंडी- कपिल पाटील

  • वर्धा - रामदास तडस

  • नागपूर- नितीन गडकरी

  • अकोला- अनुप धोत्रे

  • नंदुरबार- डॉ. हिना गावित

Mahayuti Politics
Prakash Amebdkar : एकटे किंवा सगळे मिळून लढुया, पण...; शिवतिर्थावरून प्रकाश आंबेडकरांचं विरोधकांना मोठं आवाहन

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

महाविकास आघाडीचा देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने दोन फॉर्म्युले ठरवले आहेत. ज्यामध्ये वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास आणि सोबत न आल्यास असा विचार करुन हे फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत.

वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल. ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ९ आणि वंचित ४ जागा असा फॉर्म्युला असणार आहे. तर वंचित महाविकास आघाडीसोबत न आल्यास २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com