Maharashtra Budget 2023 LIVE Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2023 LIVE Updates : वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प; अजित पवार यांची टीका

महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत.

Vishal Gangurde

वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प; अजित पवार यांची टीका

आज विधिमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावरून अजित पवार यांनी टीका केली. वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे होणार

राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे होणार आहे. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)

मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे बांधण्यात येईल.

समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार; शिंदे सरकारकडून घोषणा

राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे. सिंदखेड राजा ते शेगाव विस्तार करण्यात येणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अहवाल तयार होत आहे. यामुळे शक्तीपीठ जोडली जाणार आहे. दोन ज्योतिर्लिंग इतर तीर्थक्षेत्र जोडली जाणार असून हा रस्ता सहा जिल्ह्यातून जाणार आहे.

दिलासादायक! शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये देण्यात येणार आहे.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज; किती वाजता सादर करणार?

आज शिंदे-फडणवीस सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्याआधीच विरोधक आक्रमक झाले. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी देखील पाहायला मिळाली. आज अर्थसंकलल्प दुपारी २ वाजता सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

शिंदे सरकार शेतकरी विरोधी; नाना पटोले यांचा हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाना पटोले म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान यावर आम्ही सभागृहात मुद्दा उपस्थित केला. कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चर्चा करावी, अशी आम्ही विनंती केली. मात्र, सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे. सरकार हे शेतकरी विरोधी आहे.

अर्थसंकल्प मांडण्याआधीच विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

आज शिंदे-फडणवीस सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्याआधीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यावरच विरोधकांनी आंदोलन सुरू केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; राज्यातील जनतेला काय मिळणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे सरकारकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT