११ वी प्रवेश वेबसाईट ठप्प
महाराष्ट्र FYJC च्या प्रवेशाचा गोंधळ
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जात अडचणी
शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नीट पेपरफुटीचं पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचाही पुरता फज्जा उडाल्याचं समोर आलंय. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थी कसे वेठीस धरले गेलेत? कुणामुले हा गोंधळ उडालाय.? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात 11वी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झालीये. अशातच आता राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मनस्ताप सहन करावा लागतोय. सलग दुसऱ्या दिवशी संकेतस्थळ ठप्प झाल्यानं लाखो विद्यार्थी वेठीस धरले गेलेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं कंत्राट दिलेल्या कंपनीवरच यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत कशामुळे अडथळे येत आहेत ते पाहूयात...
राज्यातील शिक्षण विभागानं क्षमता नसलेल्या कंपनीला ऑनलाइन प्रवेशाचं कंत्राट दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय. प्रवेश प्रक्रियेतील अट आणि शर्तींमध्ये बदल केल्याचा आणि सुरक्षा प्रमाणपत्रांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळे वेबसाईटवर तांत्रिक बिघाड झाल्यानं विद्यार्थ्यांना नोंदणी आणि पसंतीक्रम अर्ज भरण्यात अडचण येतेय. इतकंच नव्हे तर शिक्षण विभागातील अधिकारी आणि कंत्राटदारांमधील कथित संगनमतामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. महाआयटीऐवजी खासगी कंपनीला प्राधान्य दिल्यानं प्रक्रियेचा फज्जा उडून वेळापत्रकात वारंवार बदल केला जातोय.
गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्रस्त झालेत. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे काही ठिकाणी संथगतीने तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे, पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेले आरोप माध्यमिक शिक्षण संचालनालयाने फेटाळून लावलेत. तर काही शिक्षणतज्ज्ञांनी वारंवार येणाऱ्या या अडचणींवर कायमस्वरूपी उपाय सूचवले आहेत.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी असलेली वेबसाईट ठप्प झाल्यानंतर शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना अर्जासाठी 25 मेपर्यंत मुदतवाढ दिलीये. विशेष म्हणजे, वेबसाईटचं सर्व्हर डाऊन होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.