- ओंकार कदम, जितेश काेळी
Mahableshwar Cold Weather : पश्चिम महाराष्ट्रसह काेकणात थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर गोठले आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा (satara) जिल्ह्यात 10.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नाेंदविले गेले. रत्नागिरी जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे. दापोली येथील कोकण (kokan) कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागात गुरुवारी पहाटे साडेपाचपर्यंत ९.८ इतके नीचांकी तापमान नोंदविले गेले. (Maharashtra News)
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर (mahableshwar) गोठले आहे. महाबळेश्वर शहरातील पारा जरी १३ अंश सेल्सिअस दाखवत असले तरी वेण्णा लेक आणि लिंगमळा भागात मात्र पारा ५ ते ६ अंशावर आल्याने या ठिकाणचे दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळाले. वेण्णा लेक भागातील जेटी आणि बोटींवर बर्फाची चादर पसरली असल्याचे दिसून आले. दरम्यान महाबळेश्वरातील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मांदियाळी आहे.
दापोलीत हुडहुडी; पारा १० अंशावर
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागात गुरुवारी पहाटे साडेपाचपर्यंत ९.८ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविले गेले. बुधवारी सकाळी १० अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली हाेती. थंडीच्या या हंगामातील या सर्वाधिक कमी तापमानाची नोंद दापोली (dapoli cold waether) तालुक्यात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून पहाटे व रात्रीच्या वेळी शेकोटी धगधगत असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवडाभरा पासून दापोली तालुक्यात कमी तापमानाची नोंद होत होती. साधारण तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले. आतापर्यंत गुंडाळून ठेवलेले स्वेटर्स लोकांनी बाहेर काढले.
शहरात चाैका चाैकात शेकोट्या पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र आहे. दरम्यान या वर्षातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आज झाली आहे अशी माहिती दापोली (dapoli) येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने कळवली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.