mahableshwar 7 yrs girl passed away today in pune.  saam tv
महाराष्ट्र

Mahabaleshwar News : जनरेटर स्फोटातील सात चिमुकल्यांपैकी महाबळेश्वरच्या लेकीची आज पुण्यात मावळली ज्याेत

Durga Devi Visarjan 2023 : स्फोटात भाजलेली मुले जिवाच्या आंकताने किंचाळत हाेती.

ओंकार कदम

Mahabaleshwar News :

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरात दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट झाला हाेती. या घटनेत लहान मुलांसह सात जण जखमी झाले हाेते. घटनेनंतर मुलांवर सातारा शहरातील एका रुग्णालयात उपचार केले गेले. त्यानंतर गंभीर स्वरुपातील मुलांना पुण्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यापैकी एका सात वर्षाच्या मुलीचा आज मृत्यू झाल्याची बातमी महाबळेश्वरात धडकल्यानंतर शहरात शाेककळा पसरली. (Maharashtra News)

महाबळेश्वर येथील कोळी आळीतील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीत जनरेटरच्या पेट्रोलच्या पाईपला गळती लागली. त्यानंतर जनरेटरने पेट घेतला. यात मोठा स्फोट झाल्याने मिरवणुकीला लागबाेट लागले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत देवीच्या मूर्तीजवळ बसलेली सात छोटी मुले गंभीर जखमी झाली. भाजलेली मुले जिवाच्या आंकताने किंचाळत हाेती. या सर्व मुलांवर साता-यात प्राथमिक उपचार करुन त्यातील काहींना पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान गेले कित्येक दिवसांपासून मृत्यूची कडवी झुंज देणारी ओवी (वय सात) हिचा उपचारादरम्यान आज (शनिवार) पुण्यातील एका रुग्णालयात मृत्यू झाला. ओवीच्या मृत्यूची बातमी महाबळेश्वरात धडकताच शहरातील चाैका चाैकात हळहळ व्यक्त केली जात हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Pune : मुंब्र्यानंतर पुण्यात छापेमारी, कोंढव्यात एकजण ताब्यात, दहशतवादी जुबेर हंगरगेकरसोबत कनेक्शन

Gavran Style Paneer Chilli Recipe: आजीच्या हातची गावरान स्टाईल पनीर चिली, आता फक्त १० मिनिटांत बनवा, सोपी रेसिपी

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking : धक्कादायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

SCROLL FOR NEXT