Prakash Ambedkar on MVA: Mahavikas Aghadi will not end like India Aghadi: Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: महाविकास आघाडी इंडिया आघाडीप्रमाणे संपुष्टात येणार नाही: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar On MVA: महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

साम टिव्ही ब्युरो

>> आवेश तांदळे

Prakash Ambedkar On MVA:

भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांना 39 कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या महाविकास आघाडी तील (MVA) घटक पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा माझी आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम आहे आणि राहील, असेही त्यांनी सांगितले.  (Latest Marathi News)

राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया अलायन्समधून बाहेर पडल्याने, काँग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी इंडिया आघाडीप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी मला अजूनही आशा आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, अलीकडेच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी झाले होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीत 12 जागांची मागणी करणारे वंचित आता महाविकास आघाडीत 6 जागांची मागणी करण्याचा प्रस्ताव केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

सूत्रांनी सांगितलं होतं की, यापूर्वी राजगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी 6 जागांचा प्रस्ताव मांडला होता. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 12 जागांची मागणी करणारे वंचित आता महत्वाच्या 6 जागा या मिळाव्यात, अशी मागणी करणार आहेत, असं सांगण्यात आलं होतं. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत वंचित हा महत्वाचा फॅक्टर ठरला होता. त्यामुळे यंदाच्या जागावाटपात वंचितच्या मतांचा टक्काही महत्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT