mahavikas aghadi  Saam tv
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi News : निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, सत्ताधाऱ्यांना धक्का बसणार?

Mahavikas Aghadi on local body election : निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीने सांगलीत मोठा निर्णय घेतलाय. यामुळे सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा सुरू झालीये.

Vishal Gangurde

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

सांगलीत महाविकास आघाडी एकत्र लढणार

महाविकास आघाडीच्या निर्णयाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. आयोगाच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीनेही मोठा निर्णय घेतला आहे. सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची घोषणा जयंत पाटील, विश्वजीत पाटील आणि विशाल पाटील यांनी केली. महाविकास आघाडीच्या घोषणेनंतर सांगलीत सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ठाकरे गट आणि राजू शेट्टी आणि इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.

'निवडणूक घेतल्या पाहिजेत, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली होती. त्याचबरोबर ज्यांना आपल्या मागे लोक आहेत,असा आत्मविश्वास आहे. त्यांनी बॅलेटवरच निवडणुका करण्याचा आग्रह केला पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला लगावला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकींबाबत मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी मतमोजणी घ्यावी,अशी मागणी देखील जयंत पाटील यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT