Sharad pawar News Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली; कोणत्या प्रभागात ठाकरे गट अन् शरद पवार गटाची लढाई होणार?

Ahilyanagar Political News : अहिल्यानगर महापालिकेच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटली आहे. त्यामुळे काही प्रभागात आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट समोरासमोर लढणार आहे.

Vishal Gangurde

अहिल्यानगरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी

महाविकास आघाडी फुटल्याने समीकरणे बदलली

समीकरणे बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार झाली आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणे शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. शहरात 17 पैकी 8 प्रभागांत ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी समोरासमोर लढणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

शहरातील 17 प्रभागांतील 68 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र या उमेदवारीमुळे आघाडीतीलच प्रमुख पक्षांमध्ये 17 पैकी तब्बल 8 प्रभागांत ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार आहे. त्यामुळे हे प्रभाग सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

प्रभाग क्रमांक 2, 6, 9, 11, 13, 15 आणि 16 मध्ये आघाडीतील दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकल्याने मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम केले असल्याने त्यांना डावलणे योग्य ठरणार नाही, या भूमिकेतूनच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काही प्रभागांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिली आहे. एकीकडे महायुतीचे गणित तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत लढती, यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक यंदा अधिकच रंगतदार आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पुण्यात सभा

Rava Cutlet Recipe: आठवड्याच्या पहिल्या दिवशी नाश्त्याला बनवा कुरकुरीत रवा कटलेट, सोपी आहे रेसिपी

Solapur Crime: भेटायला बोलावून तरुणाने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर स्वत:वरही केले वार; हत्याकांडाच्या घटनेने सोलापूर हादरले

Dalimba chutney Recipe : आरोग्यदायी डाळिंबाची आंबट-गोड चटणी, वाचा सोपी रेसिपी

Cold Protection: बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी 'ही' एक चूक करताय, आताच अलर्ट व्हा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT