IND vs NZ : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; यशस्वी, सिराजची धमाकेदार एन्ट्री, हार्दिक पंड्याबाबात मोठी अपडेट

IND vs NZ team india : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. या संघात यशस्वी आणि सिराजची धमाकेदार एन्ट्री केली आहे.
Team India loses toss
Team India loses tosssaam tv
Published On
Summary

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा

न्यूझीलंड विरुद्ध संघाची धुरा शुभमन गिलकडे

संघात एकूण १५ खेळाडू असणार

न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंड आणि भारतामध्ये ११ जानेवारीपासून होणार्‍या वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात एकूण १५ खेळाडू असणार आहेत. या संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड कमिटीने शनिवारी ३ जानेवारी ३ सामन्यांसाठी वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. भारताच्या संघात शुभमन गिलने कमबॅक केलं. त्यांच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिरीज याचं देखील टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. नीतीश रेड्डी देखील संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

श्रेयस अय्यरच्या एन्ट्रीने ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट झाला आहे. गायकवाडने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात कमाल बॅटिंग केली होती. गायकवाडने चौथ्या क्रमांकावर उतरून शतक ठोकलं होतं. शतक ठोकल्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. टीम इंडियाने ३ अष्टपैलू, ४ जलद गोलंदाज, २ विकेटकीपर आणि ६ फलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर पंड्याला एका सामन्यात १० षटके गोलंदाजी करण्याबाबत बीसीसीआयकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यात आगामी आयसीसी पुरुष टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर निवड समितीने आराम मिळाव, यासाठी त्याच्या निवडीबाबत विचार केलेला नसल्याचे समजतंय.

टीम इंडिया : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर,प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग , यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा

Team India loses toss
धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी
Team India loses toss
निवडणूक होताच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

IND vs NZ: वनडे सीरीजचं वेळापत्रक

११ जानेवारी : पहिली वनडे, वडोदरा

१४ जानेवारी : दूसरी वनडे, राजकोट

१८ जानेवारी : तिसरी वनडे, इंदूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com