Maharashtra Budget Session 2024 Saam TV
महाराष्ट्र

Budget Session: फसवणूक नको, आरक्षण द्या; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

Maharashtra Budget Session 2024: मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध, अशी घोषणाबाजी करीत विरोधकांनी विधानभवनाचा परिसरात दणाणून सोडला.

Satish Daud

Maharashtra Budget Session 2024 Live Update

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आजपासून (२६ फेब्रुवारी) राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहे. अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर लक्षवेधी आंदोलन केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फसवणूक नको, आरक्षण द्या, असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध, अशी घोषणाबाजी करीत विरोधकांनी विधानभवनाचा परिसरात दणाणून सोडला.  (Latest Marathi News)

"मनोज जरांगे पाटलांना छळतंय कोण, महायुतीचा त्रिकोण", असे फलक देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात घेतले होते. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख धीरज देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण ५ दिवस चालणार असून अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. ओबीसी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.

अधिवेशनाचे कामकाज कसे असेल?

  • अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण होईल.

  • त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दस आभार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.

  • पुढे 2023-24 साठी पूरवणी मागन्या सादर केल्या जातील आणि शासकीय कामकाजाला सुरूवात होईल.

  • या अधिवेशनात भाजप आमदार राजेंद्र पाटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना आज श्रद्धांजली देखील वाहण्यात येणार आहे.

  • त्यानंतर 27 फेब्रुवारीला पुरवणी यांच्या मागण्यांवर चर्चा करून मंजूर करण्यात येणार आहे.

  • पुढे 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता सादर केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?

Silver Price and Investment: चांदीच्या दरात १७,००० रुपयांची मोठी घसरण; दर आणखी पडण्याची शक्यता, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Saam TV Exclusive : अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, तज्ज्ञ काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: हरवलेली आणि अपहरण झालेली मुले..., सोशल मीडियावरील अफवांवर मुंबई पोलिसांचा खुलासा

Budget 2026: DMart तर ऐकलंय; पण She-Mart म्हणजे नेमकं काय रे भाऊ? ग्रामीण महिलांसाठी ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT