Mahavikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीचं टेन्शन वाढणार, महाविकास आघाडीचा मोठा डाव; विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना दिली महत्वाची जबाबदारी, VIDEO

uddhav thackeray News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मोठा डाव टाकला आहे. महविकास आघाडीने विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना महत्वाची जबाबदारी दिली आहे.

Pramod Subhash Jagtap

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने बैठकांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी मतदारसंघाची चाचपणी देखील सुरु केली आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती केल्याने महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आताच जाहीर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना माहिती दिली आहे. तसेच इंडिया आघाडीत असणाऱ्या इतर छोट्या पक्षांना देखील आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना हायकमांडने काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या पुढील काही दिवसांत २ सभा

आगमी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहे. तर या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची १६ तारखेला सभा होणार आहे. त्यातून उत्तम समन्वय असावा, यासाठी बैठक सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होईल. तसेच जागावाटपाचे सूत्र देखील ठरणार आहे, अशीही माहिती वडेट्टीवर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT