Gopinath Munde Saam TV
महाराष्ट्र

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री गोपीनाथ गडावर, भाजपचे बडे नेते अनुपस्थित, मुंडेंचा विसर पडला की काय?

आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत अनेक वर्ष भाजपमध्ये काम करणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर उपस्थित होते.

डॉ. माधव सावरगावे

परळी : कोरोनामुळे सलग दोन वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी स्मृतिदिन कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यभरातील गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक, त्यांचे चाहते येऊ शकले नव्हते. यावेळी मात्र राज्यभरातल्या वेगळ्या भागांमध्ये असलेले मुंडे (Gopinath Munde) यांचे चाहते आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज गोपीनाथ गडावर आले होते.

याच गडावर (Gopinath Gad) आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत अनेक वर्ष भाजपमध्ये काम करणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी देखील मुंडे यांचे पक्षातील योगदान, भाजपसाठी केलेली मेहनत सांगितली. पण राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना गोपीनाथ मुंडे यांचे योगदान माहित नसेल का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी त्यावेळी भाजपमध्ये (BJP) असलेले एकनाथ खडसे आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी भाजपचा मोठा एकही चेहरा दिसला नाही. आज व्यासपीठावर फक्त खासदार सुजय विखे, आमदार सुरेश धस यांच्यासह भाजप मधले स्थानिक पदाधिकारी व्यासपीठावर होते.

हे देखील पाहा -

गोपीनाथ मुंडे यांची भाजपला तळागाळात घेऊन जाणारे नेते अशी ओळख होती. जो समाज कधीही भाजपबरोबर नव्हता त्याला एकत्रित आणून राज्यातील भाजपची ताकद वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी समाज एकवटला. अनेक वर्षे त्या समाजाचे नेतृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं नाव होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाला सोबत घेत पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला.

पण स्वकीयांकडूनच त्यांना बळ मिळू शकला नाही. आज ओबीसीसाठी (OBC) लढणारे आणि ओबीसी आरक्षण जिंकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बोलावून गोपीनाथ मुंडे आणि ओबीसी समाजासाठी किती मोठं काम केलं आणि त्यातूनच भाजप किती मोठी झाली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही चर्चा होती की गोपीनाथ मुंडे यांचा राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विसर पडला आहे का? अशाच चर्चा गडावर आलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या चाहत्यांसह पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये होत्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT