घोडेबाजार करायला आमदार बाजारातील वस्तू आहेत का ?; प्रवीण दरेकरांचा सवाल

आता राज्यसभेच्या निवडणूक होणार हे अटळ आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.
Pravin Darkar
Pravin Darkar Saam Tv

मुंबई : आज राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. शिवसेनेने त्यांचा दुसरा उमेदवार मागे न घेण्याची भूमिका घेतली. तर भाजपने (BJP) देखील आपला तिसरा उमेदवरी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणूक होणार हे अटळ आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाष्य केलं आहे. ( BJP Leader Pravin Darekar News In Marathi )

'घोडेबाजार करायला आमदार बाजारातील वस्तू आहेत का, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडींच्या नेत्यांना केला आहे. दरेकर पुढे म्हणाले, 'आघाडीकडे आत्मविश्वास होता, तर ते चर्चेसाठी का आले. इतर मतदार करणार असलेल्या मतांच्या बळावर भाजपचा उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. दरेकर म्हणाले, 'पंकजा मुंडे नाराज नाहीत. गोपीनाथ मुंडेंना भाजपने अभिवादन केलं आहे. शिवराजसिंह चौहान हे मोठे नेते आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतल्या घडामोडींमुळे भाजप नेते मुंबईत असल्याने कार्यक्रमाला गेले नाहीत'. दरेकर जनगणनेवर भाष्य करताना म्हणाले, 'देशात जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. मात्र याबाबत मागणी करायची का हे भाजप नेते निर्णय ठरवतील, असं दरेकर यांनी सांगितले.

Pravin Darkar
महाविकास आघाडीचे ४ उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी : संजय राऊत

दरम्यान,राज्यसभेचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनीही राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. धनंजय महाडिक म्हणाले, 'भाजपचे तीनही राज्यसभेचे उमदेवार निवडून येतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.सगळ्याच पक्षातील आमदार संपर्कात आहेत, आम्हाला ते मतदान करतील असा विश्वास आहे. आमचे स्वतःचे आणि १० ते ११ मतांची आम्हाला आवश्यकता आहे.सद्विवेक बुद्धीने आम्हाला काहीजण मतदान करतील'.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com