Madhyapradesh Bhopal Crime news saam tv news
महाराष्ट्र

Shocking: गर्लफ्रेंडला गळा दाबून संपवलं, बॉयफ्रेंड ४ दिवस मृतदेहाजवळ झोपला; मित्रामुळे कृत्य समोर

Man Lives With Girlfriends Body: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून; चादरीत गुंडाळून मृतदेह सोडून आरोपी फरार. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. गळा दाबून खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह चादरीत गुंडाळलं आणि दोरीने बांधलं. तसेच मृतदेह भाड्याच्या घरात सोडून पळ काढला. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील भोपाळमधून समोर येत असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रितिका सेन असे मृत तरूणीचे नाव आहे. तर सचिन राजपूत असे आरोपीचे नाव आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. गायत्री नगर येथील परिसरात दोघेही एका भाड्याच्या खोलीत राहत होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळीस दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. बाचाबाचीनंतर सचिनला राग अनावर झाला. त्याने थेट रितिकाचा गळा आवळला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सचिन घाबरला. त्याने रितिकाचा मृतदेह चादरीत गुंडाळलं आणि दोरीनं बांधलं. नंतर त्याच भाड्याच्या घरात सोडून पळ काढला.

यानंतर सचिन त्याच्या मित्राकडे गेला. मद्यपान करत त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. मित्रही नशेत असल्यामुळे त्याला विश्वास बसला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सचिनने पुन्हा मित्राला प्रेयसीचा खून केल्याची माहिती दिली. प्रकरणाची माहिती मिळताच त्याला धक्का बसला. त्याने थेट यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीचे भाड्याचे घर गाठले. तसेच तपास केला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

यादरम्यान, आरोपीने ४ दिवसांपूर्वीच खून केला असून, त्या मृतदेहासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महत्वाचे पुरावे पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी सखोल तपास करीत आरोपीला अटक केली आहे. तसेच पुढील कपास सुरू आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक पुण्यात पार पडली

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT