Lumpy Skin Disease In Palghar रुपेश पाटील
महाराष्ट्र

Palghar News : पालघर जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव; प्रशासन अलर्ट मोडवर, गुजरातमधील पशुंना बंदी

Lumpy Skin Disease In Palghar: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या कोंढले या गावात एका पशुला लम्पीची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर: राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांना लम्पी आजाराची (Lumpy Skin Disease) लागण होत आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातही लम्पी आजाराचा शिरकाव झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या (Wada) कोंढले या गावात एका पशुला लम्पीची लागण झाल्याचं उघड झालं आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. (Lumpy Skin Disease News)

जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्यानंतर पशु मालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशानाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच कोंढले गावाच्या परिसरातील पाच किलोमीटरच्या आवारात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे, सोबतच जनजागृतीलाही सुरुवात केली आहे. पशुंच्या जवळ स्वच्छता ठेवावी तसेच इतर मार्गदर्शन पशु मालकांना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत. (Palghar Latest News)

गुजरातमध्ये लिंपी आजाराचे प्रमाण जास्त आहे, त्यात पालघर जिल्हा हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. त्यामुळे गुजरातमधून येणाऱ्या पशुवर प्रशासनाने बंदी घातली आहे. जिल्ह्यातील तीन चेक पोस्टवर तपासणीसाठी पालघर पशुसंवर्धन विभागाच्या टीम तैनात केल्या गेल्या आहेत. या चेक पोस्टवर महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व पशुंची तपासणी केली जाणार आहे.

लम्पी त्वचा रोगाची लक्षणे?

लम्पी त्वचा रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशुंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

SCROLL FOR NEXT