मुंबई: गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) कालपासून सुरूवात केली आहे. मुंबईती महानगरात काल रात्रिपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवेमध्ये एक ते दीड फूट पाणी भरले आहे. त्यामुळे अंधेरी सबवेमधील गाड्या बंद पडायला सुरुवात झाली आहे. आता अंधेरी सबवे वाहनांसाठी व नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. गेल्या १ तासापासून सतत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. (Maharashtra Rain Update)
मुंबईत पहाटे ५ वाजल्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सध्या पावसाचा जोर वाढला आहे.
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तवला होता. १५ आणि १६ सप्ंटेबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या ४८ तासांनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आहे.
राज्यभरात कालपासून पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने झोडपले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. लोकल ट्रेनवर याचा परिणाम होणार आहे. ट्रकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (Mumbai Rain Update)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.