Mumbai Local Train| मध्य रेल्वेचे अलर्ट मोटरमन, १२ लोकांचे वाचवले जीव

सेट्रल लोकलच्या अलर्ट मोटरमननी एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत वेळेवर आणि तत्पर कारवाई करून १२ जणांचे जीव वाचविले आहेत.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam TV
Published On

मुंबई: मुंबईतील (Mumbai) लोकल ट्रकवर अनेक अपघात घडत असतात, तर काहीजण आत्महत्या करण्यासाठी ट्रकवर येतात. यात गेल्या काही महिन्यात मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले असल्याची माहिती समोर आली आहे. सेट्रल लोकलच्या अलर्ट मोटरमननी एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत वेळेवर आणि तत्पर कारवाई करून १२ जणांचे जीव वाचविले आहेत, यापैकी ४ जीव ऑगस्ट २०२२ मध्ये वाचविले आहेत.

समोर अपघात (Accident) होणार असल्याचे लक्षात येताच मोटरमन यांनी ब्रेक लावून अनेकांचे जीव वाचविले आहेत. यात ३१ ऑगस्ट रोजी संजय कुमार चौहान, मोटरमन, मुंबई विभाग, यांनी ठाणे-अंबरनाथ लोकलवर काम करत असताना, किमी 33/122 येथे एक व्यक्ती ट्रेनच्या समोर रुळावर पडलेली पाहिली, त्यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली. तो माणूस नंतर उठला आणि ट्रॅकवरून निघून गेला आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न टळला, त्यामुळे एक जीव वाचला. ट्रेन मॅनेजरला रीतसर माहिती दिली आणि ट्रेनचा प्रवास सुरूच राहिला.

Mumbai Local Train
'मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते'; एकनाथ शिंदेंच्या भाषणावर शिवसेना नेत्याची टीका

२८ ऑगस्ट रोजी, जी. एस. बिस्ट, मोटरमन, मुंबई विभाग, टिटवाळा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलवर काम करत असताना, अंदाजे ५५ ते ५६ वर्षे वयोगटातील एक महिला दिवा-ठाणे धीम्या मार्गावर KM क्रमांक 34/211 वर ट्रॅकच्या मध्यभागी येऊन ट्रेनसमोर उभी राहिली. जीएस बिस्ट यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि महिलेच्या काही मीटर आधी ट्रेन वेळेत थांबवली आणि तिचा जीव वाचवला. त्याने तिला दोन महिला प्रवाशांच्या मदतीने रुळावरून हटवले, तिला ठाण्यापर्यंत ट्रेनमध्ये नेले आणि तिला ड्युटीवर असलेल्या जीआरपी ठाण्याच्या ताब्यात दिले.

Mumbai Local Train
कल्याण : 'त्या' १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश होणार, Saam TV च्या बातमीची दखल

२७ ऑगस्ट रोजी, एस. व्ही. जाधव, मोटरमन, मुंबई विभाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे येथे कर्तव्यावर असताना, एक मुलगी चिंचपोकळी-भायखळा अप लोकल मार्गादरम्यान रुळावर येताना दिसली. त्याने लगेचच काही फूट आधी ट्रेन थांबवून मुलीचा जीव वाचवला. त्यांनी ट्रेन मॅनेजरला याची माहिती दिली. नंतर, आरपीएफ कर्मचार्‍यांनी त्या मुलीला ट्रॅकवरून बाहेर काढले आणि मोटरमनने गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षितपणे काम केले.

१९ ऑगस्ट रोजी राम शब्द, मोटरमन, मुंबई विभाग, अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ट्रेनमध्ये काम करत असताना, चिंचपोकळी स्थानकात प्रवेश करताना, एक मुलगा दिसला ज्याचे वय अंदाजे 19-20 वर्ष असावे त्याने, ट्रॅकच्या मध्यभागी उडी मारली आणि ट्रेनसमोर उभा राहिला. श्री राम शब्द यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या आरपीएफने मुलाला ट्रॅकवरून हटवले.

जीव वाचवण्याच्या १२ घटनांपैकी ४ जणांचे जीव वाचवण्याच्या घटना ऑगस्टमधील आहेत, २ प्रकरणे जुलै मधील आहेत तर ३ जूनमधील आहेत. २ प्रकरणे मे मध्ये आणि १ प्रकरण एप्रिलमध्ये घडले आहेत. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com