Police investigation revealed a shocking honour killing case where a woman was poisoned and her body was later burnt to destroy evidence. saam tv
महाराष्ट्र

प्रेमसंबंधातून थरकाप उडवणारा खून! तरुणीला विष देऊन संपवलं अन्…

Honour Killing Shocker: प्रेमसंबंधातून उफाळलेल्या रागातून तरुणीची विष देऊन हत्या करून मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुक्केरी–रायबाग परिसरातील या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Omkar Sonawane

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या धक्कादायक खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या कारणावरून एका तरुणीची विष देऊन हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडी परिसरातील कृष्ण सहदेव पाटील आणि सत्यव्वा संतोष हेलावरा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सत्यव्वाचा विवाह रायबाग तालुक्यातील हनबरट्टी येथे झाला होता. लग्नानंतरही दोघांचे संबंध कायम होते. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघे घरातून निघून बेलावडी येथे राहायला गेले. यानंतर दोन्ही कुटुंबांनी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या. कुटुंबीयांना त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोघांना तिथून नेले. त्यानंतर सत्यव्वा अचानक बेपत्ता झाली.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याच्या रागातून सत्यव्वाला महाराष्ट्रात आणण्यात आलं. सांगली जिल्ह्यातील आरगा येथे २१ मार्चच्या रात्री तिला विष पाजून हत्या करण्यात आली. इतकंच नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच रात्री तिचा मृतदेह स्मशानभूमीत जाळण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत मृताचा भाऊ शानूर हेलावरा, काका प्रकाश हेलावरा आणि मेहुणा कल्लप्पा गदवी यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT