Surabhi Jayashree Jagdish
कोथिंबीरमध्ये विविध जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्ससह वनस्पतीजन्य घटक आढळतात. त्यामुळे रोजच्या आहारात योग्य प्रमाणात कोथिंबीरचा समावेश करणं आरोग्यदायी आहाराचा एक भाग ठरू शकतो.
कोथिंबीर पाण्यात भिजवून किंवा उकळून तयार केलेलं पाणी शरीराला द्रव मिळवून देतं. पुरेसं द्रवपदार्थ घेतल्यामुळे लघवी अधिक पातळ राहण्यास मदत होते आणि किडनी स्टोनच्या प्रतिबंधात योग्य हायड्रेशन महत्त्वाचं मानलं जातं.
कोथिंबिरीचं पाणी प्यायल्याने किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडतात असा दावा केला जातो. त्याचप्रमाणे किडनी स्टोन विरघळवण्यासाठी हे पाणी उपचार म्हणून वापरता येतं, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.
कोथिंबिरीचं पाणी प्यायल्याने शरीराला द्रव मिळतो. पुरेसं पाणी प्यायल्याने लघवीचं प्रमाण योग्य राहण्यास मदत होते आणि किडनीला रक्तातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते.
कोथिंबिरीमध्ये काही अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे किडनीच्या आरोग्यासाठी हे एक पूरक आहारातील घटक ठरू शकतं. मात्र किडनीचे आजार बरे करण्यासाठी कोथिंबिरीच्या पाण्यावर अवलंबून राहू नये.
किडनीचा आजार, वारंवार किडनी स्टोन किंवा डॉक्टरांनी द्रवपदार्थांवर मर्यादा घातली असल्यास कोथिंबिरीचं पाणी नियमितपणे सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. काही किडनीच्या आजारांमध्ये द्रव, सोडियम किंवा इतर खनिजांचं प्रमाण व्यक्तीनुसार नियंत्रित करावं लागू शकतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.