Ekvira Devi Saam Tv
महाराष्ट्र

Ekvira Devi: पालखी येताच फटाके फोडले, चवथाळलेल्या मधमाश्यांचा भाविकांवर हल्ला; VIDEO व्हायरल

Devotees Attacked By Bees At Ekvira Fort: एकवीरा गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला. मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी झालेत.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

लोणावळ्यातील एकवीरा गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एकविरा गडावर एकवीरा गडावर हुल्लाडबाज भाविकांनी कलर धूराचे फटाके वाजवले. त्यामुळे मधमाश्यांच्या पोळ्याला इजा झाली. यानंतर गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला. या हल्ल्या अनेक भाविक जखमी झाले.

हुल्लडबाज भाविकांनी एकवीरा मंदिराजवळ कलर धुराचे फटाके वाजवल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा झाली. इजा होताच मधमाश्या उडायला लागल्या. या मधमाश्यांनी भविकांवर हल्ला केला. मधमाश्यांनी अनेक भक्तांना चावा घेतला. मधमाश्यांनी लहान मुलांसह महिलांना देखील चावा घेतला.

मधमाश्याच्या हल्ल्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली. तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले. महिलांनी आपल्या ओढणी आणि साडीच्या पदराने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. काही भाविकांनी तर जमिनीवर झोपून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.

मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती. त्या पालखीतल्या काही भक्तांनी गडावर फटाके फोडले. त्याचा फटका बाकीच्या भाविकांना बसला. मधमाश्या चावलेल्या भाविकांवर गडावरच प्राथमोपचार करण्यात आले. गडावर फटाके वाजविण्यास बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT