Pavana Dam News 
महाराष्ट्र

Pune Pawana Dam News: फिरायला आला अन् काळाने घात केला... पवना धरणात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू

मुंबईतील एकाच कॉलनीमध्ये राहणाऱ्या नऊ तरुण आणि नऊ तरुणींचा ग्रुप लोणावळा (Lonavala) परिसरात फिरण्यासाठी आला होता.

दिलीप कांबळे

Lonavala News: पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंबईच्या (Mumbai) तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. साहिल विजय सावंत असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याच्या कार्यास सुरूवात केली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील एकाच कॉलनीमध्ये राहणाऱ्या नऊ तरुण आणि नऊ तरुणींचा ग्रुप लोणावळा (Lonavala) परिसरात फिरण्यासाठी आला होता. लोणावळा परिसर फिरून झाल्यांनतर ते पवना धरण (Pavana Dam) परिसर फिरण्यासाठी आले. यावेळी पवना धरणाच्या पाण्यात हे तरुण पोहण्यासाठी उतरले. मात्र या ग्रूपमधील साहिल सावंत याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडाला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक पोहोचले असून या युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांना पाचारण करण्यात आले आहे. फिरायला आलेल्या तरुणावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT