Lonar World Heritage Saam Digital
महाराष्ट्र

Lonar World Heritage: लोणार जागतिक हेरिटेज, विदेशी पर्यटक येतात, सुविधांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Lonar World Heritage News: लोणार विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोणार सरोवराचे हेरिटेज महत्त्व लक्षात घेऊन या परिसरातील विकासकामे दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी.

Sandeep Gawade

Lonar World Heritage

बुलडाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून याठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखालील लोणार सरोवर विकास आराखडा समितीच्या माध्यमातून विकास आराखड्याच्या कामांची अंमलबजावणी सुरू आहे. पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या लोणार परिसरात जागतिक दर्जाच्या पर्यटन सोयी-सुविधा द्याव्यात. लोणार विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यातील कामे जागतिक दर्जाची करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात लोणार विकास आराखड्याबाबत बैठक झाली. बैठकीस सहकार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय रायमूलकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ. अरूण मलिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोणार विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोणार सरोवराचे हेरिटेज महत्त्व लक्षात घेऊन या परिसरातील विकासकामे दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी. सरोवराजवळ वन्यजीव अभयारण्य आहे. याठिकाणी लावण्यात येणाऱ्या संरक्षण जाळ्या, प्रसाधनगृहे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासारख्या पायाभूत सुविधा या वारसा स्थळाला शोभणाऱ्या, साजेशा असाव्यात. पशुपालक तारेच्या संरक्षण जाळ्या तोडून जनावरे घेऊन आत चरायला जाऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी. लोणार विकास आराखड्यासाठी संवर्धन वास्तुविशारद (कन्झर्व्हेटिव्ह आर्किटेक्चर) नियुक्त करावा. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाची मदत घ्यावी. याबाबत न्यायालयाला अवगत करावे.

सरोवराच्या संरक्षण भिंती हेरिटेज दर्जानुसार असल्या पाहिजेत. विभागीय आयुक्तांनी कामांच्या दर्जाबाबत दक्षता घ्यावी. राज्य शासन लोणार सरोवर विकास आराखड्यासाठी आवश्यक निधी देत आहे. मात्र, त्यातून होणारी कामे जागतिक दर्जाची असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने हेरिटेज कामांचा अनुभव असणाऱ्या सक्षम वास्तुविशारदास नेमून जागतिक दर्जाच्या कामांचा समावेश असणारा आराखडा एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

शासनाने ३६९ कोटींचा लोणार विकास आराखडा मंजूर केला असून त्यातील कामे २०२२ ते २०२७ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. या विकास आराखड्यामध्ये ७६ कामांचा समावेश असून त्यापैकी १७ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ३० कामे प्रगतीपथावर आहेत. तर अंदाजपत्रकीय स्तरावर २७ कामे आहेत. विकास आराखड्यातील कामांचा न्यायालयामार्फत नियमित आढावा घेण्यात येतो, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT