युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. कालच अमरावती विभागीय आयुक्त यांनी लोणार येथे भेट देऊन पुरातत्व विभाग , नगरपालिका , वन्यजीव विभाग , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
2020 मध्ये लोणार सरोवराला 'रामसर दर्जा ' मिळालेला आहे . आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच दिल्ली येथे युनेस्को ची जागतिक वारसा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्य शासनाकडून हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी यावेळी दिली आहे.
देशातील 40 ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे लोणार हे 41व स्थळ ठरणार आहे . या यादीमध्ये 1983 साली अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा तर 1987 मध्ये एलिफंटा लेणी , 2004 मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक , 2013 मध्ये पश्चिम घाट आणि 2018 मध्ये मुंबईतील व्हिक्टोरिया गॉथिकचा समावेश झाला आहे.
लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे. लोणार सरोवराची सरासरी व्यास 1.2 किलोमीटर आहे. तर उल्का क्रेटर रिमचा व्यास सुमारे 1.8 किलोमीटर आहे. लोणार सरोवरातील पाणी खारट आणि क्षारीय दोन्ही आहे . भूगर्भशास्त्रज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ, निसर्गशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांनी यांनी तलावाच्या परिसंस्थेच्या विविध पैलूंवर अभ्यास प्रकाशित केला आहे.
स्मिथसोनियन संस्था , युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे , जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, सागर विद्यापीठ आणि भौतिक संशोधन प्रयोगशाळेने या जागेचा विस्तृत अभ्यास केला आहे. आयआयटी बॉम्बेने केलेल्या 2019 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, तलावाच्या मातीतील खनिजे अपोलो कार्यक्रमादरम्यान परत आणलेल्या चंद्र खडकांमध्ये सापडलेल्या खनिजांसारखेच आहेत . नोव्हेंबर २०२० मध्ये तलावाला संरक्षित रामसर स्थळ घोषित करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.