Bachchu Kadu Vs Navneet Rana
Bachchu Kadu Vs Navneet Rana Saam Tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: नवनीत राणांची लोकसभेची जागा बच्चू कडूंच्या 'प्रहार'ला मिळणार? महायुतीत अमरावतीच्या जागेवरुन रस्सीखेच

Shivani Tichkule

अमर घटारे

Amravati News Today: आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच आता राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप शिवसेना युतीत शिवसेनेने 22 जागांची मागणी केली असतानाच आता मित्र पक्षांनी देखील जागेची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी विधानसभा निवडणुकीत 15 ते 16 जागांची मागणी केली असून तसेच अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघाच्या जागेच्या दावा ठोकणार असल्याच बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कालच बच्चू कडू यांनी दावा ठोकल्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बच्चू कडू यांचे अतिशय निकटवर्ती व विश्वासू म्हणून रवींद्र वैद्य यांची ओळख आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी रवींद्र वैद्य यांना खासदार नवनीत राणा विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झालेली आहे. (Political News)

सध्या बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे महायुतीत आहे असे असताना आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेवर दावा ठोकल्याने बच्चू कडू विरुद्ध आमदार रवी राणा (Ravi Rana) असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

मागील अनेक वर्षापासून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली असल्याची प्रतिक्रिया ही रवींद्र वैद्य यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता आमदार बच्चू कडू यांनी रवींद्र वैद्य यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर प्रहार विरुद्ध आमदार रवी राणा असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

SCROLL FOR NEXT