Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Maharashtra Politics 2024 : तब्बल २० वर्षांनंतर संजय निरुपम यांची पुन्हा घरवासी झाली असून आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. . दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडली होती.
Sanjay Nirupam
Sanjay Nirupam Saam Digital

विनय म्हात्रे

तब्बल २० वर्षांनंतर संजय निरुपम यांची पुन्हा घरवासी झाली असून आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी वक्तव्ये केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रवेशावर जाहीर भूमिका मांडली होती.

लोकसभा लढवायची होती-संजय निरुपम

२० वर्षात काँग्रेस मध्ये होतो, यावेळी लोकसभा लढवायची होती, मात्र माझ्यासोबत दगफटका केला गेला. मात्र आता २० वर्षानंतर मी स्वगृही परतलो असून माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेनेत असताना पूर्वी अडचणी येत होत्या त्या आता येत नाहीत. आता एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो पाळला जाईल आणि मुंबईतील शिवसेनेच्या तिन्ही जागा निवडणू आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास संजय निरुपम यांनी दिला.

संजय निरुपम धडाडीचे नेते-एकनाथ शिंदे

धडाडीचे नेते म्हणून संजय निरुपम यांची ओळख आहे. त्यांना बाळासाहेबांनी दोन वेळ राज्यसभेवर पाठवलं. लोकसभेसाठी इच्छुक असताना देखील एकदा बोलल्यानंतर पक्षाच काम करण्यासाठी तयार झाले. यापुढे पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असा विश्वास देत हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी असल्याचंही ते म्हणाले

Sanjay Nirupam
PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

यापूर्वी लोकांनी मुंबईचा विचार केला नाही स्वतःचा विचार केला. महापालिका आयुक्तांना सांगितल पर्यटकांसाठी सर्व कोळीवाड्यात फूड प्लाझा सुरू करतोय. कोळीवाड्यांचा विकास हाती घेतलाय. एकनाथ शिंदेंच्या डायरीत होणार नाही हा शब्द नाही. काम करण्याची इच्छा पाहिजे म्हणून सर्व कामे मार्गी लागताहेत. मुंबाच्या सहाही जागा जिंकणार आहोत कारण आपले सर्वांशी संबंध चांगले आहेत.

Sanjay Nirupam
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com