Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

Shantigiri Maharaj: शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा करत राजकारण ढवळून काढणारे शांतीगिरी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. निवडणुकीच्या आखाड्यात शांतिगिरी महाराज उतरल्याने हेमंत गोडसे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची डोकेदुखी वाढलीय.
Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं
Shantigiri MaharajSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे

नाशिक: नाशिक मतदारसंघातील महायुतीचं टेन्शन कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आता शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारीच्या दाव्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीपुढे निवडणूक जिंकण्याचं आव्हान उभं राहिलंय. अपक्ष उमेदवारी दाखल करताना शांतिगिरी महाराजांनी थेट हिंदुत्वचं कार्ड उपसल्याने महायुतीची चिंता अधिकच वाढलीय.

निवडणुकीच्या आखाड्यात शांतिगिरी महाराज उतरल्याने हेमंत गोडसे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची डोकेदुखी वाढलीय. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा करत राजकारण ढवळून काढणारे शांतीगिरी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर शांतीगिरी महाराज अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

निवडणूक लढवण्याचा भक्त परिवाराचा ठाम निश्चय केलाय. राज्यातील १३ ते १४ जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार सक्रीय आहे. आमच्या सर्व मंडळींनी निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा विडा उचललेला आहे. खरं हिंदुत्व कुणाचं? हे आता जनताचं ठरवेल. महायुतीच हिंदुत्व खरं की आमचं हिंदुत्व खरं हे जनता ठरवेल असं शांतिगिरी महाराज म्हणालेत. हिंदुत्वाचा विषय घेण्याची आम्हाला गरज राहिलेली नाही.आमच्याकडे जो भगवा आहे तो त्यागाचे प्रतीक असल्याच महाराज म्हणालेत.

नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असताना शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केल्याची घोषणा केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री शिंदेंनी महाराजांना फार्म भरायला सांगितलाच नसल्याचं स्पष्टीकरण दीपक केसरकरांनी दिलंय.

कोण आहेत शांतीगिरी महाराज

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत. २००४ ला इलाहाबादमधील कुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदवी मिळाली. २००९ मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत १ लाख ४२ हजार मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतिगिरी महाराजांचं व्यसनमुक्ती, शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे.

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं
Shantigiri Maharaj : संकटमोचक धावून गेले, त्यांनाही अपयश आलं; भाजपसमोरचं संकट वाढलं!, शांतीगिरी महाराज ठाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com