Nashik News: नाशिकच्या सप्तश्रृंगी मंदिरातही ड्रेस कोड लागू होणार? मंदिर समिती विश्वस्तांची माहिती

Dress Code In Saptashrungi Mata Devi Temple Nashik: वणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik, SAPTASHRUNGI MATA DEVI TEMPLE
Nashik, SAPTASHRUNGI MATA DEVI TEMPLESaamtv

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Dress Code In Nashik Temple: महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी ही वस्त्र संहिता लागू केल्याचं महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर आता नाशिकमध्येही मंदिरात प्रवेश करताना ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

Nashik, SAPTASHRUNGI MATA DEVI TEMPLE
Congress MP Balu Dhanorkar Health News : बाळू धानोरकरांची तब्येत बिघडली, नागपूरमधील खासगी रुग्णालयातून दिल्लीला एअर लिफ्ट करणार

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर (Nagpur) शहरातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यानंतर मंदिरांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्येही ड्रेस कोड सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या वणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्हा (Nashik) हा पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखला जातो. वेगवेगळ्या भागातून अनेक पर्यटक नाशिकमध्ये गर्दी करत असतात. याच धर्तीवर स्थानिक गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल तर ड्रेस कोड लागू करण्याबाबत विचार करु अशी माहिती सप्तशृंगी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Nashik, SAPTASHRUNGI MATA DEVI TEMPLE
Pune Crime News: पोलिस हवालदाराचा महिलेवर अत्‍याचार; कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत धक्‍कादायक कृत्‍य

दरम्यान, नागपूरमध्ये सर्वप्रथम याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नागपूरातील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांचा समावेश आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास त्यांना ओढणी, पंचा दिला जाईल, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com