Loksabha Election 2024 News: Chandrakant Khaire or Ambadas Danve Who Will Be The Next Candidate of Shivsena To Contest From Chhatrapati Sambhaji Nagar constituency? Know Party Officials's View SAAM TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? उद्धव ठाकरेंनी विचारल्यावर पदाधिकाऱ्यांनी सांगितली पसंती

Nandkumar Joshi

गिरीश कांबळे, मुंबई

Chandrakant Khaire Vs Ambadas Danve :

पदाधिकारी, नेत्यांसोबतच्या आढावा बैठकांमधून लोकसभा निवडणुकीची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटासमोर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे की अंबादास दानवेंना उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. दुसरीकडे पदाधिकाऱ्यांनी या दोघांपैकी एका नावाला पसंती दिल्याचे सूत्रांकडून समजते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितली तरी मी मारेन, निवडणुका लढवण्याचा तर काही प्रश्नच नाही, असं ठणकावून सांगत अंबादास दानवेंनी लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) लढवण्याची तयारी दाखवली आहे.

दुसरीकडे, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करतात आणि त्यांना लोकसभेत काय करायचे असं चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे यांच्यापैकी नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'मातोश्री'वर आढावा

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे (Chandrakant Khaire Vs Ambadas Danve) या दोन्ही नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोघा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा (Chhatrapati Sambhaji Nagar) आढावा घेतला. मातोश्रीवर ही बैठक झाली.

बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाच बोलावले होते. दानवे आणि खैरे या या बैठकीला नव्हते. ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा केल्याचे समजते. लोकसभेचा उमेदवार कोण हवा? खैरे की दानवे? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्याची माहिती समजते.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात (Chhatrapati Sambhaji Nagar) उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांची पसंती चंद्रकांत खैरे यांच्या नावाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण आणि उमेदवार निवडीसंदर्भात संभाजीनगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. आता खैरे आणि दानवेंच्या लोकसभा उमेदवारीच्या दाव्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते?

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. तत्पूर्वी अंबादास दानवेही इच्छुक असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. त्यामुळं दानवे आणि खैरे यांच्यात वाद असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याला खैरे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आपल्यात आणि दानवे यांच्यात काहीही वाद नाही. दानवे राज्यात चांगले काम करत आहेत. अशात त्यांना लोकसभेत काय करायचं आहे, असे ते म्हणाले.

ठाकरेंकडून आढावा

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून आढावा बैठकांचे सत्र सुरू आहे. सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघाचा तर, काल छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच आढावा घेण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली. आजही मातोश्रीवर लोकसभा आढावा बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये उमेदवारी निश्चितीवर चर्चा केली जाणार आहे. जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांकडून संभाव्य उमेदवारांविषयी माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT