Khaire vs Danve News: अंबादास दानवेंना लोकसभेत काय करायचं? चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

Former MP Chandrakant Khaire: अंबादास दानवेंच्या भूमिकेमुळे राज्यातील पक्ष भक्कम असल्याचं दिसलं. त्यांनी विधान परिषदेचे विरोधीनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं,असं म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक केलं. तर दुसऱ्या बाजुला त्याचं लोकसभेत काम नसल्याचं म्हटलं.
Chandrakant Khaire
Chandrakant Khairesaam Tv
Published On

MP Chandrakant Khaire Vs Ambadas Danve :

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलीय. मात्र याचवेळी अंबादास दानवे आणि त्यांच्यातील वादावर भाष्य केलं. दानवे आणि आपल्यात वाद नसल्याचं म्हणत त्यांनी दानवे लोकसभेत नको असल्याचं सुचवलं. दानवे राज्यात चांगलं काम करतात, त्यांना लोकसभेत काय करायचं? आमची नॅशनल इमेज असल्याचं म्हटलंय. ते माध्यम प्रतिनीधीशी बोलत होते. (Latest News)

मी जेव्हा रिटायर होऊ तेव्हा पाहू..

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची आणि शिवसेना ठाकरे गटाची तयारी कशी चालू असल्याचा प्रश्न साम प्रतिनीधीने केला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी त्यांची उमेदवारीची इच्छा बोलून दाखवली. माझा पराभव जेव्हा झाला तेव्हापासून मी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. उद्धव ठाकरे यांनीच मातोश्रीवर बोलवून कामाला लागा, असे आदेश दिले.

माझा पराभव जेव्हा झाला तेव्हापासून मी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीवर बोलवून कामाला लागा, असे आदेश दिले. मी आहे अजून, मी जेव्हा रिटायर होऊ तेव्हा पाहू. मी फक्त पाच वर्षे काम करणार. दोघांमधून आम्ही कुणी एक उमेदवार असेल. पण तिकीट दिले तर मी लढणार असल्याचं खैरे म्हणाले.

खैरेंच्या विधानाचा अर्थ काय

माजी खासदार चंद्रकात खैरे दोन्ही बाजूने विधान केलं आहे. एकाबाजुला त्यांनी अंबादास दानवेंच्या भूमिकेमुळे राज्यातील पक्ष भक्कम असल्याचं दिसलं. त्यांनी विधान परिषदेचे विरोधीनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं, असं म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक केलं. तर दुसऱ्या बाजुला त्याचं लोकसभेत काम नसल्याचं म्हटलं. या विधानामुळे खैरेंच्या मनातील नाराजी अजून कमी झालेली नसल्याचं म्हटलं जात आहे.

..आमची नॅशनल इमेज

अंबादास दानवेंनी सभागृहात चांगलं काम केले त्यामुळे नागपूरहून आल्यानंतर मी त्यांचं स्वागतही केलं. माझ्यात आणि आंबदास दानवे मध्ये वाद नाही, आंबदास दानवे माझे शिष्य,विरोधी पक्षनेते पदाला साजेल, असे काम करतात. मी आंबदास दानवे यांनी लोकसभा लढू नये, असं म्हणत नाही, पण ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. अंबादास दानवेंना लोकसभेत काय करायचं ? आमची नॅशनल इमेज आहे.पुन्हा सरकार आल्यास उद्धव ठाकरे साहेब आंबदास दानवे यांना चांगले पद देऊ शकतात.आंबदास राज्यात चांगलं काम करतो.

Chandrakant Khaire
Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळावा एकच असतो अन् तो मर्दांचा असतो: अंबादास दानवे यांचा शिंदे गटावर घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com