Vishal Patil  Saam tv
महाराष्ट्र

Sangli Constituency : सांगलीत ठाकरे गटाला धक्का; विशाल पाटील लोकसभा लढण्याच्या निर्णयावर ठाम, आज शक्तिप्रदर्शन करणार

Lok Sabha Election : सांगली नगरीचे आराध्य दैवत गणरायाचे दर्शन घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन विशाल पाटील रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

Ruchika Jadhav

विजय पाटील

सांगलीतून निवडणूक लढण्यासाठी विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आजपासून त्यांनी प्रचार आणि शक्तिप्रदर्थन करण्यास सुरूवात केलीये. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असं चित्र दिसत आहे.

सांगली नगरीचे आराध्य दैवत गणरायाचे दर्शन घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन विशाल पाटील रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

तसेच विशाला पाटलांना पाठींबा देण्यासाठी या रॅलीत भाजपाचा राजीनामा दिलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप, तसेच कवठेमहाकाळचे शिवसेना नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे हे देखील सहभागी होणार असल्याचे विशाल पाटील समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

रॅली नंतर काँग्रेस कमिटीसमोर भव्य मेळावा पार पडणार असून यामध्ये विशाल पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता फक्त २ दिवस शिल्लक आहेत. असे असूनही महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून अद्यापही धुसफूस कायम आहे.

सांगलीमध्ये महायुतीकडून संजयकाका पाटी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीये. मात्र यामुळे काँग्रेसचे विषाल पाटील नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह आपला अपक्ष आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यातील दिग्गजांमध्ये आज शाहू महाराज, धैर्यशील मोहिते पाटील, ओमराजे निंबाळकर, सुनेत्रा पवार देखील अर्ज भरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT