Lok Sabha Election 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : राज्यात चौथ्या टप्प्यात ५२.४९ टक्के मतदान; शिरूरमध्ये सर्वात कमी, तर या मतदारसंघात सर्वाधिक मतदान

Lok Sabha Election Update : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.८९ टक्के मतदान झालं तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान झालं.

Sandeep Gawade

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.८९ टक्के मतदान झालं तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान झालं.

एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

नंदुरबार - ६०.६० टक्के

जळगाव - ५१.९८ टक्के

रावेर - ५५.३६ टक्के

जालना - ५८.८५ टक्के

औरंगाबाद - ५४.०२ टक्के

मावळ - ४६.०३ टक्के

पुणे - ४४.९० टक्के

शिरूर - ४३.८९ टक्के

अहमदनगर- ५३.२७ टक्के

शिर्डी - ५२.२७ टक्के

बीड - ५८.२१ टक्के

देशातील ९६ मतदारसंघात ६३.०४ टक्के मतदान

१० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडली असून ६३.०४ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. देशात या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झालं आहे.पश्चिम बंगालमध्ये ७६.०२ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये ३६.८८ टक्के, आंध्र प्रदेशमध्ये ६८.२० , बिहारमध्ये ५५.९२ टक्के, झारखंडमध्ये ६४.३० टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये ६९.१६ टक्के, ओडिशात ६४.२३ टक्के, तेलंगणात ६१. ५९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५८.०२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

SCROLL FOR NEXT