Lok Sabha Election
Varsha Gaikwad Saam Tv
महाराष्ट्र

Varsha Gaikwad : मी काँग्रेसची एकनिष्ठ कार्यकर्ता; नॉट रिचेबल झालेल्या वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

Ruchika Jadhav

Lok Sabha Election :

काल मी वयक्तीक कामात होते. मी आमच्या पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. हे नाराजीनाट्य नाही तर ही आमची भूमिका आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून नाराजी असल्याचं म्हटलं जातंय. येथे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. त्यामुळे काँग्रेसने या जागेवरून नाराजी व्यक्त केलीये. त्यातूनच वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला बुधवारी दांडी मारली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं.

बैठकीला हजर न राहिल्याने सर्वत्र वर्षा गायकवाड यांची चर्चा होती. त्यांचा फोन देखील काल दिवसभर नॉट रिचेबल राहिला. त्यामुळे त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, अशी माहिती देखील समोर आली होती. यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, त्यांची पद्धत आणि स्वभाव मला माहित आहे. त्यामुळे मी काल कुणाचीही भेट घेतलेली नाही.

हे नाराजी नाट्य नाही ही आमची भूमिका आहे. आम्ही आमच्या पक्षाची काही भूमिका असेल तर ती समोर मांडतो. महायुतीत आज काय गत आहे हे दिसत आहे. त्यांनी स्वतःकडे आधी पाहावं, अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला.

महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचे नाव जाहीर झाले आहे. या निर्णयावर त्या पुढे म्हणाल्या की, जो पक्ष निर्णय घेणार तो आम्ही स्वीकारू. आता पक्षाने निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात आम्ही काम करू. आता पुढे गेलं पाहिजे, मी ही पुढे गेली आहे, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं.

खूप चर्चान्नानंतर हे निर्णय झाले आहेत. प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे. पक्षाचे काही निर्णय स्वीकारावे लागतात.पक्षश्रेष्टी आणि ठाकरेंनी काही निर्णय घेतला तर आम्ही स्वागत करू, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Friendly Car: कार घेण्याचा विचार करताय? तर 'या' आहेत ५ लाखांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट कार

Today Marathi News : नारायण राणेंनी कपटनितीने विजय मिळवला, विनायक राऊतांची टीका

BJP Meeting News: राजधानी दिल्लीतील भाजपच्या बैठकीआधीच मुंबईत खलबतं?

Police Recruitment 2024: राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया कशी असेल? A टू Z माहिती एका क्लिकवर

Amravati News : ग्रामपंचायतीने केला दारूबंदीचा ठराव; गावात अवैध धंदे फोफावल्याने ग्रामस्थ हैराण

SCROLL FOR NEXT