Kolhapur Loksabha Result Update Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Loksabha Result Update : हिंगोलीनंतर कोल्हापूरात दोन EVM मशीनध्ये बिघाड

EVM Machine Issue : कागलच्या दुसरी फेरी असताना तर राधानगरीची तिसरी फेरी सुरू असताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळालीये.

Ruchika Jadhav

रणजीत माजगावकर

कोल्हापूमध्ये मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभेतील दोन ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. कागल आणि राधानगरी विभागातील मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय.

कागलची दुसरी फेरी असताना तर राधानगरीची तिसरी फेरी सुरू असताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळालीये. सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे.

अशात सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत शाहू महाराज आघाडीवर होते. त्यानंतर 2 री फेरी सुरू असताना शाहू महाराज ११११८ मतांनी आघाडीवर आहेत.

संजय मंडलिक मतमोजणी केंद्रावर दाखल

दरम्यान, कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्या फेरीतील झालेल्या मतदानाचा आढावा घेतला. आताशी फक्त पहिली फेरी झाली आहे अजून 31 फेऱ्या बाकी आहेत, म्हणत कागल आणि चंदगड मतदारसंघात मोठी आघाडी मिळेल असं त्यांनी म्हटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : संभाजीनगरमधील नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, इन्स्टिट्यूटकडून हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Pune : पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा, नवरा-बायकोच्या वादात...

Face Serum : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

SCROLL FOR NEXT